ABOUT US

वैश्य समाज मुंबई : स्थापना

वैश्य समाज, मुंबई या संस्थेच्या स्थापनेपूर्वीची पूर्वपिटीका वर उधृत केली आहे.

वैश्य विद्यार्थी सहाय्यक मंडळी'चे काम १९१० पर्यंत चालल्यानंतर कित्येक अडचणीमुळे ते १९२० पर्यंत तहकूब राहिले. पुढे १९२० नंतर सर्वश्री बाबाजी सदाशिव पेडणेकर, विष्णू बाळकृष्ण महाडेश्वर, सखाराम महादेव पारकर, शंकर धोंडो मसुरकर, परशुराम आबा सातोसे, विष्णूसदाशिव पेडणेकर आदि कार्यकर्त्यांनी संस्थेचे कार्य पुढे चालविण्याचे ठरवून त्याप्रमाणे संस्थेचे पुनरुज्जीवन केले. संघशक्तिने प्रयत्न केल्याशिवाय समाजस्थिती सुधारणे शक्‍य नाही असे 'वैश्य मंडळ' व 'वैश्य विद्यार्थी सहाय्यक मंडळ, मुंबई' या दोन्ही संस्थांच्या कार्यकारी मंडळाच्या सभासदांना वाटू लागले. म्हणून या दोन्ही संस्थांच्या सभासदांची एक संयुक्‍त संस्था करावी व संयुक्‍त संस्थेचे कार्यक्षेत्र विस्तृत करावे असा विचार निश्चित झाल्यानंतर, बऱ्याच वाटाघाटीनंतर दि. ६ मे १९२२ रोजी दोन्ही संस्थाचे एकीकरण करण्यात आले.

१] ज्ञातीतील गरीब होतकरू, विद्यार्थ्या, वाड्गयात्मक, यांत्रिक, औद्योगिक, शासकीय, धंदेवाईक शिक्षणासाठी आर्थिक मदत करणे व सदर शिक्षणाचा प्रसार करणे.
२] ऐक्यवृद्धी , संघशक्ती, परस्पर प्रेमभाव, दळणवळण वगैरे जेणेकरून होतील असे उपाय योजणे.
३] ज्ञातीतील शिक्षणविषयक व समाजोन्नतीस पोषक अशा संस्थांचे एकीकरण करणे.
४] मतभेद विरहीत अशी सामाजिक व धार्मिक स्वरुपाची उन्नतीची कामे करणे.
५] समाजोन्नती ज्यांच्या योगाने होईल अशी प्रसंगोपात उत्पन्न होणारी कामे हाती घेणे.
६] सदरील सर्व कार्यासाठी फंड गोळा करणे.
७] समाजासाठी इमारत उभारणे.
८] परस्पर सहाय्यकारी पतपेढी (को-ऑप. सोसायटी) स्थापणे.

वरील उद्देश साध्य करण्यासाठी गेल्या ५४ वर्षात कार्यकर्त्यांनी आपल्या शक्तीनुसार अल्पस्वल्प प्रयत्न केले हे खालील आढावा अवलोकन केल्यास दिसून येईल. दि. ३१ मार्च १९२३ रोजी प्रा. कृष्णाजी महादेव खाड्ये यांच्या अध्यक्षतेखाली ज्ञातीतील पाच वर्षातील पदवीधरांचा सत्कार करण्यासाठी स्नेहसंमेलन भरविण्यात आले.

१९२४ साली ज्ञातीतील पहिल्या स्त्री पदवीधर डॉ. कु. कृष्णबाई नारायण वटे यांचा बडोद्याचे कै. न्या. नारायण बळवंत पडते यांच्या अध्यक्षतेखाली सत्कार करण्यात आला.

१९२५ साली 'धी वैश्य लिटररी अ‍ॅण्ड सोशल क्लब' ची स्थापना करण्यात आली. समाज संघटनेच्या दृष्टीने संस्थेला हा उपक्रम यशदायी ठरला. संस्थेची कार्यकर्ती मंडळी सदर क्लबमध्ये वारंवार एकत्र येऊ लागल्याने संस्थेच्या कार्याला चालना मिळू लागली व तरुण होतकरु कार्यकर्त्यात समाजकार्याची अभिरुची निर्माण झाली. त्यामुळे तरुण कार्यकर्ते लाभले. याचवर्षी धारगाळ (गोवा) येथे वैश्य परिषदेचे पहिले अधिवेशन पार पडले. या अधिवेशनाला बडोदे मुंबई पासूल कोचीन त्रावणकोर पर्यंतचे ज्ञातीबंधू प्रथमच एकत्र आले. या परिषदेपासून प्रेरणा घेऊन पुढे वेंगुर्ले, कुडाळ, बेळगांव, मालवण, कोल्हापूर या ठिकाणी 'वैश्य समाज' स्थापन झाले व कोल्हापूर, शहापूर, बेळगांव येथे विद्यार्थी वसतिगृह उभी राहीली.

१९२७ साली मुंबई येथे 'वैश्य सेवक’ मासिक सुरू करण्यात आले या मासिकामुळे समाजात जागृती व प्रचार करण्यास उपयोग झाला.

१९३१ साली म्हापसे येथे “वैश्य” या नावाचे ज्ञातीच्या सर्वांगीण उन्नतीसाठी मासिक सुरू करण्यात आले. दुर्देवाने वर्षभरातच हे मासिक बंद पडले.

१९३४ साली मुंबई येथे समाजाचे दुसरे अधिवेशन भरविण्यात आले. या परिषदेतील ठरावानुसार 'आदर्श वैश्य' हे समाजाचे मुखपत्र सुरू मिळाली आहे. वरील परिषदेत पास झालेल्या दुसऱ्या ठरावानुसार वैश्य एकीकरण मंडळ स्थापन झाले. शहापुर (बेळगांव) येथे “वैश्य लायब्रेरी व वसतीगृह स्थापन झाले.”

१९३६ साली कराची येथे कोकणस्थ वैश्य समाज (सिंध) कराची ही संस्था स्थापन झाली.

१९३७ साली कु. दुर्गा लक्ष्मण देऊलकर या समाजातील पहिल्या उच्च शिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्या विद्यार्थीनीला शुभार्शिवाद निरोप देण्यात आला. याच वर्षी “वक्तृत्व वैश्य युवक" संघाची स्थापना झाली.

१९४० साली ज्ञातीगृहासाठी 'वैश्य ज्ञातिगूह फंड' नावाची संस्था स्थापन झाली.

१९४० ते ४५ या सहा वर्षाच्या काळात संस्थेतर्फे झालेल्या वैश्य ज्ञातीच्या सभा, संमेलने, करमणुकीचे कार्यक्रम, सत्कार समांरभ वैगरे मुळे मुंबई व मुंबई बाहेर संस्थेच्या कार्याचा प्रचार झाला. जागृती झाली. संस्थेच्या कार्याकडे लक्ष वेधले. श्री. शां. का. मळीक यांनी स्वखर्चाने गोवा, सावंतवाडी, मालवण, वेंगुर्ले, बेळगांव, कोल्हापूर वगैरे ठिकाणी क्रिष्ट संस्थेच्या कार्याचा प्रचार केला. त्यामुळे संस्थेच्या प्रगतीला पोषक अशी परिस्थिती निर्माण झाली.

१९४५ साली श्री. स. बा. महाडेश्वर यांचा मुंबई महापालिकेचे सभासद म्हणून निवडून आल्याबद्दल व कृष्णाबाई पांडुरंग भिसे या एम.ए. या चित्रकलेच्या उच्च परीक्षेत पहिल्या नंबराने पास झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.

१९४६ साली “वैश्य विद्यार्थी संघ" चा रौप्यमहोत्सव साजरा करण्यात आला व सदर संघ “वैश्य एज्युकेशन सोसायटी" या नावाने करण्यात आला.

गुरुमाठाचा इतिहास

हळदीपूर मठाचा इतिहास साधारण अडीचशे वर्षांपूर्वीचा जूना असावा. मात्र पूर्व इतिहास व गुरुपरंपरा फारच जुनी असावी. कारण उत्तर कॅनरामध्ये इतर मठाची स्थापना साधारण इ.स. १४७५ च्या सुमारास झाली, त्यावेळी किंवा समकालीन आपल्या वैश्य मठाची स्थापना झाली असावी. म्हणजे ५५० वर्षांपूर्वी त्याच कालखंडात द्रवीड परंपरा म्हणजे मठाचा अधिकारी ब्राह्मणच असला पाहिजे हा नियमसुद्धा शिथिल झाला होता. श्री संस्थान हळदीपूर केरेगद्दे कृष्णाश्रम मठ उत्तर कॅनराच्या (कर्नाटक राज्य) होनावर ता क्यातील हळदीपूरमधील केरेगद्दे या गावी आहे. कुमठ्यावरून मंगलोरला जाणाऱ्या नॅशनल हायवेवरून आठ किलोमीटर वनश्रीनी नटलेल्या मार्गानंतर डाव्या बाजूला एक रस्ता जातो, तेथून आत गेल्यावर आपल्याला वैश्य समाज अस फलक दिसेल. तेथूनच थोड्याशा अंतरावर निसर्गरम्य व शांत परिसरात गुरुमठ आहे.

वैश्यांची गुरुपरंपरा शांताश्रमस्वामी, श्रीमत् कृष्णास्वामी, श्रीमत् शांतारामश्रमस्वामी, व श्रीमत् शांताश्रमस्वामी अशी आढळून येते. श्रीमत् शांताश्रम शृंगेरीच्या स्वामींनी कोणालाही शिष्य म्हणून न स्वीकारता १८८२ साली समाधी घेतली, त्या वेळेपासून गुरुपरंपरा खंडित झाली. मधल्या काळात युद्ध, अराजकता, लूटमार, मुला-बाळांना पळविणे, मंदिरे नष्ट करणे, खंडण्या वसूल करणे यामुळे सामान्य लोकांमधे भीतीचे वातावरण होते, यामुळे सामान्यजनाचा मठाशी संपर्क तुटल्याकारणाने आणि अस्थिर परिस्थितीमुळे गुरुपरंपरा खंडित झाली असावी. १८८२ नंतर १९२० सालापर्यंत धार्मिक प्रवृत्तीच्या श्रद्धावान सेवाभावी, निष्ठावंत व्यक्तींनी मठाचा सांभाळ केला.

१९२० साली सेवा समितिची स्थापना झाली व ६.४.१९५३ साली ट्रस्टची स्थापना झाली व जिर्णोद्धाराचे काम सुरू झाले. १९७२ पासून पुढे गोवा, केरळ, कर्नाटक, आणि महाराष्ट्रात वैश्यांची एकत्र येण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. गुरुमठ आकार घेत असतानाच भावी गुरुच्या शोधासाठी समाजामध्ये मंथन चालू झाले होते व त्याप्रमाणे चि. उपेश बाबूंची भावी गुरु म्हणून निवड झाली व शृंगेरीच्या शारदापीठामध्ये कुमार उपेश बाबूनी दिनांक २५.६.९३ रोजी शिक्षणास प्रारंभ झाला. एकीकडे गुरुमठाचा जीर्णोद्धार होत असतानाच दुसरीकडे आध्यात्म ज्ञानासारख्या गहन विषयासाठी ११ वर्षासाठी उपेशबाबूची तपश्चर्या सुरू झाली. चि. उपेश बाबूंचा जन्म अर्नाकुलम जिल्ह्यात कोचीन तालुक्यात, श्री. पी गोपाल शेट व सौ. सुशीला या शिवभक्त दांपत्याच्या पोटी २.११.१९८१ रोजी झाला. श्री गोपालशेट हे विश्वामित्र गोत्रीय असून विष्णू हे त्यांचे कुलदैवत आहे. गोपाळ शेट यांना तीन मुले व तीन मुली. सर्वांचा जन्म कोचीनमध्येच झाला.

गुरुमठाचा विस्तार, जिर्णोद्धार पुर्णत्वास येत होता. गुरु आगमनाच्या प्रतीक्षेत वैश्य बांधव होते. ११ वर्षाचा काळ पूर्ण झाला होता. आणि श्रृंगेरी शारदापीठाचे स्वामी श्री. भारतीतार्थ यांनी १२.३.२००४ हा शुभदिन कुमार उपेशबाबुचा पट्टाभिषेक दिवस म्हणून जाहीर केले आणि वैश्याच्या आनंदाला भरती आली. गुरुमठामध्ये दिनांक ६ मार्च ते १३ मार्च २००४ पर्यंत अनेक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. दिनांक ८ मार्च रोजी चित्रापूर गुरुमठाचे श्रीमत सद्याज्योत स्वामीजींच्या हस्ते श्री उपेशबाबूना समाजाचे गुरु म्हणून वैश्य समाजाकडे सुपूर्त करण्यात आले. त्यांचे “श्रीमत वामनाश्रम स्वामीजी- कृष्णाश्रममठ, हळदीपूर मठाधिपती म्हणून नामकरण करण्यात आले.

आमची गुरुपरंपरा श्री श्री वामनाश्रम महास्वामीजींच्या कृपा आशीर्वादाने १२ मार्च २००४ साली चालू झाली

वैश्य आणि इतिहास

प्रत्येक घराण्याचे एक कुलदैवत असते. बहुतेक घरामधून लग्न, मुंज, वास्तु, मंगलकार्य अशा मोठ्या कार्यक्रमानंतर कुलदैवताला जाणे हा महत्त्वाचा भाग असतो.

कुलदैवत किंवा कुलदेवी म्हणजे काय? आपले कुलदैवत कोठे आहे? त्याचे महत्व काय? कुलदैवतासंबंधी आपल काय कर्तव्य आहे? हे सर्व प्रश्न दिवसेंदिवस अनुत्तरित राहतात. विभक्त्त कुटुंब पद्धतीमुळे याची उत्तरे सांगणारी ज्येष्ठ मंडळी जवळ नसतात आणि घरात एखादी समस्या उध्दभवली की धावपळ सुरु होते. आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी ज्या देवतेची उपासना आवश्यक असते, अशा कुळातच भगवंत आपल्याला जन्माला घालतो. त्या देवतेला कुळाची कुलदेवता म्हणतात. आध्यात्मिक प्रगतीसाठी कुलदेवतेची उपासना कशी करावी, त्याविषयी शास्त्रीय माहिती जाणून घेतल्यास अध्यात्मात जलद प्रगती होते.

कुलदेवता या शब्दाचा अर्थ ! - ‘कुलदेवता’ हा शब्द ‘कुल’ आणि ‘देवता’ या दोन शब्दांनी मिळून बनला आहे. कुळाची देवता ती कुलदेवता. ज्या देवतेची उपासना केल्यावर मूलाधारचक्रातील कुंडलिनी शक्ती जागृत होते, म्हणजेच आध्यात्मिक उन्नतीला आरंभ होतो, ती देवता म्हणजे कुलदेवता. कुलदेवता ज्या वेळी पुरुष देवता असते, त्या वेळी तिला ‘कुलदेव’ आणि जेव्हा ती स्त्री देवता असते, तेव्हा तिला ‘कुलदेवी’ म्हणून संबोधले जाते. कुलदेवतेची उपासना करून आध्यात्मिक आणि व्यावहारिक उन्नती झाल्याचे सर्वज्ञात आहेत.

कुलदेवतेच्या उपासनेचे महत्त्व : ब्रह्मांडात असलेली सर्व तत्त्वे पिंडात आली की, साधना पूर्ण होते. श्रीविष्णु, शिव आणि श्री गणपती यांसारख्या देवतांच्या उपासनेने त्या त्या देवतेचे विशिष्ट तत्त्व वाढते; परंतु ब्रह्मांडात असलेल्या सर्व तत्त्वांना आकर्षित करण्याचे केवळ कुलदेवतेच्या जपात आहे. त्याचप्रमाणे कुलदेवता ही पृथ्वीतत्त्वाची देवता असल्याने तिच्या उपासनेपासून साधनेला आरंभ केल्यास उपासकाला कोणताही त्रास होत नाही. ज्यांच्याकडे कुलदेव आणि कुलदेवी दोन्ही असतील, त्यांनी कुलदेवीचा नामजप करावा.

कुलदेवता ठाऊक नसल्यास काय करावे ?

१] मूळ स्वरुपातील दैवते : ब्रह्मा, विष्णू, महेश, आदिमाया.
२] विष्णूची अवतार रुपातील दैवते : नृसिंह, राम, कृष्ण, परशुराम.
३] शंकराची अवतार रुपातील दैवते : कालभैरव, खंडोबा, मारुती.
४] आदिमायेची अवतार रुपातील दैवते : सरस्वती, लक्ष्मी, पार्वती, दुर्गा, चंडी, काली
५] शंकराच्या गणांचा मुख्य अधिपती, तसेच आरंभ पूजनाची देवता – गणेश
६] देवांचा सेनापती : कार्तिकेय (दक्षिण भारतात याला महत्त्व आहे. अय्यप्पा म्हणतात)
७] वैदिक देवता : इंद्र, अग्नी, वरुण, सूर्य, उषा (यातील सूर्य व अग्नी वगळता इतर दैवतांची उपासना आज प्रचलित नाही )

नोट: कुलदेवी/देवता माहीती नसल्यास वरील पैकी ज्या देवावर भक्ति आहेत त्यांची उपासना करवी या अजुन ग्रामदैवत, कुलदैवत, इष्टदैवत वगैरे दैवतांचे प्रकार आहेत. (आराध्यदैवत असाही एक प्रकार असावा पण त्यात आणि इष्टदैवतात नेमका फरक कोणता ते माहित नाही.) ग्रामदैवत ही संपूर्ण गावाचे दैवत, कुलदैवत हे कुळाचे आणि इष्टदैवत हे कोणतेही आवडणारे, आपल्यावर कृपादृष्टी ठेवणारे दैवत असते.

एखाद्याचे कुलदैवत कोणते हे कसे ठरवावे? (हे काहिसे आधी कोंबडी की अंडे सारखे झाले ना?) कुळावरून कुलदैवत व कुलदैवतावरून कुळ ठरवणे बहुदा कुळाचे एखादे दैवत असावे. कदाचित काही नातलग कुटुंबांचा एखाद्या गावाशी संबंध असावा. जिथे वस्ती केली, तिथे एक देऊळ बांधणे कुळ म्हणजे कुटुंबकबिला वाढला की म्हणत असावेत असा आपला एक अंदाज करते. अशा कुटुंबाचे एखादे आराध्य दैवत असणे शक्य असू शकेल. मग जरी लोक स्थलांतरित झाले, तरी मूळ कुळाची स्मृती राहत असावी.

कुळ म्हणजे कोणा एका मूळ पुरुषापासून पुढे निर्माण झालेले आणि एकमेकांशी रक्ताने बांधले गेलेले विस्तृत कुटुंब. (दत्तक विधान अर्थातच यात मान्य आहे. अशी तडजोड आमच्या कुळातील एका फांदीवर पाहिलेली आहे.) बहुधा गोत्र, जाती वगैरेंसारखा लहान गट किंवा टोळी म्हणजे कुळ. एकाच कुळातले लोक एकच आडनाव लावतातच असे नाही परंतु कुलदैवत, गाव, जात वगैरे वरून ते स्वतःला एकाच कुळातले मानतात असे वाटते. कुळाला इंग्रजीत क्लॅन म्हणतात असे वाटते. एकंदरीत काय कुळ म्हणजे एक टोळी यावरून महाभारतयुद्ध हे एक टोळीयुद्ध होते या वचनाची आठवण होते.

आप्त संबंधांमुळे जे एकत्र आले आहेत किंवा एकत्र वास करतात असे एका रक्ताचे व संबंधांचे जे काही लोक असतील त्या सर्वांच्या समूहास कुळ असे म्हणतात.कुळ शब्दाला मराठीत घराणे असा शब्द रूढ आहे. कुळ म्हणजे घराणे ठीक आहे परंतु कुळ म्हणजे कुटुंब किंवा जात नव्हे. एका जातीत अनेक कुळे असू शकतात.

(नोटः कुलदेवी/कुलदैवत हे आपल्या काळाचे व वंशाचे संरक्षण करणारे दैवत असतात त्यासाठी वर्षातून एकदा तरी आपल्या कुलदेवी/कुलदैवत यांचे स्थानी जाउन दर्शन घेणे ही विनंती)

पत्ता: श्रीसंस्थान कृष्णश्रम मठ, हल्दीपुर, तलुका-हन्नावर (उत्तरा कन्नड), पिन कोड - 581327 | फोन: 08387 254303 | ऑफिसः 08387 254999 | मेल: haladipurmath@gmail.com

Guru Gurumath

गोत्र, आडनावे आणि कुलदैवत

गोत्र आडनावे आणि कुलदैवत
1] वृद्धविष्णु वळंजू -->> श्रीमहालक्ष्मी, नारूळ,
वैद्य -->> श्रीसांतेरी, वेंगुर्ला,
पावसकर -->> श्रीसांतेरी, पावशी,
कवळेकर -->> श्रीवेताळ, कवळे, गोवा
2] वत्स वत्स बांदेकर -->> श्रीवैजा माऊली देवी
केणी -->> श्रीरवळनाथ, पेडणे, गोवा
सापळे -->> श्रीसांतेरीदेवी, पावशी
कपिलेश्वरी -->> श्रीकपिलेश्वर, कवळे / रामलिंग, बेळगांव
3] वांभत्य कोरगांवकर -->> श्रीसाळेश्वर, कोरगांव
शेट्ये -->> श्रीसांतेरी रवळनाथ, इब्रामपूर, पेडणे, गोवा
बल्लाळ -->> श्रीसाळेश्वर भूमिकामाता, कोरगांव, गोवा
4] विष्णुदर्शन मुंज -->> श्रीसांतेरी रवळनाथ, इब्रामपूर, पेडणे, गोवा
फळारी -->> श्रीशांतादुर्गा, नानोडा, गोवा
5] च्यवनभार्गव पेडणेकर -->> श्रीरवळनाथ भगवती, पेडणे, गोवा
गाड -->> श्रीकेळबाय, मुळगांव, डिचोली, गोवा
6] पुरीष पांगम -->> श्रीसांतेरीदेवी, पावशी
म्हाडगुत -->> श्रीमहालक्ष्मी, नारूळ
कर्पे -->> श्रीसत्पुरुष महालक्ष्मी, घोडगेवाडी
7] अगस्ति टोपले -->> श्रीचामुंडादेवी, वरगांव, डिचोली, गोवा
गोवेकर -->> श्रीचामुंडादेवी, वरगांव, डिचोली, गोवा
कामत (वळवई) -->> श्रीचामुंडादेवी, वरगांव, डिचोली, गोवा
खापणे -->> श्रीमहालक्ष्मी, बांदिवडे, फोंडा, गोवा
दड्डीकर -->> श्रीचामुंडादेवी, वरगांव, डिचोली, गोवा
अरवारे -->> श्रीसांतेरी महालक्ष्मी, पावशी
आमोणकर -->> श्रीचामुंडा, वरगांव, गोवा
8] चाणाक्ष नाटेकर -->> श्रीनाटेश्वर, नाटे, राजापूर
बोंद्रे -->> श्रीकरलाईदेवी, केसरी, मालवण
9] नित्युनंदन देऊलकर -->> श्रीतुळजाभवानी, तुळजापूर
कांदे -->> श्रीभद्रकाली, पाटगांव, कोल्हापूर
10] मांडत्य पानकर -->> श्रीमुळवीर, माळपे, पेडणे, गोवा
11] महेंद्र आळवे -->> श्रीवेतोबा, कटा, मालवण
आळवे -->> श्रीमाऊली रवळनाथ, तोर्से
शिरोडकर -->> श्रीरवळनाथ महामाया, शिरोडा | श्रीमहालक्ष्मी रवळनाथ, मुळगांव
12] उपमन्यु केसरकर -->> श्रीकरलाईदेवी, केसरी
नानोडकर -->> श्रीशांतादुर्गा, नानोडा, गोवा
13] गार्ग्य चणेकर -->> श्रीचामुंडेश्वरी, वरगांव
भणगे -->> श्रीसांतेरीदेवी, पावशी
डांगी -->> श्रीमहालक्ष्मी, नानोडा
14] अत्री फुलारी -->> श्रीमहामाया, बोर्डा, डिचोली
निखारगे -->> श्रीकरलाईदेवी, केसरी
तानावडे -->> श्रीरवळनाथ महालक्ष्मी, मुळगांव
पुनगी -->> श्रीमुळवीर, माळपे, पेडणे, गोवा
15] कुत्स खोर्जुवेकर -->> श्रीकलमादेवी सत्पुरुष, पैरा
किटलेकर -->> श्रीकलमादेवी सत्पुरुष, पैरा
16] कण्व भरतू -->> श्रीरवळनाथ, माशेल, गोवा
17] भार्गव दलाल -->> श्रीभवानीदेवी, रेड्डी, शिरोडा (महाराष्ट्र)
हिंदे -->> श्रीरवळनाथ महामाया, शिरोडा, गोवा
फायदे -->> श्रीजलसांतेरी, भिवस, मालवण
18] पराशर दाते -->> श्रीदामोदर, जांबावली, गोवा
पोवळेकर -->>
19] भृगु धावजेकर -->> श्रीशिवनाथ, प्रियोळ, फोंडा, गोवा
20] राहुगण कातकर -->> श्रीमहामाया, अंकोला
21] गौतम बेळेकर -->> श्रीपावणाईदेवी, बेळणे, कणकवली
22] शांडिल्य काणेकर -->> श्रीभवानी रवळनाथ पंचायतन, बांदा
कळंगुटकर -->> श्रीशांतादुर्गा, नानोडा, गोवा
मुंगी -->> श्रीभवानी रवळनाथ पंचायतन, बांदा
महाजन -->> श्रीभवानी रवळनाथ पंचायतन, बांदा
23] हरीत पिळणकर -->> श्रीशांतादुर्गा पिळणकरीण, पीर्ण, गोवा
गवडळकर -->> श्रीदुर्गादेवी, धारगळ
महाडेश्वर -->> श्रीसांतेरीदेवी, पावशी
तेली -->> श्रीकाळभैरव, श्रीमहालक्ष्मी, नारूळ
तेली -->> श्रीसांतेरीदेवी, पावशी
नारकर -->> श्रीसांतेरीदेवी, जैतापूर, राजापूर
वर्दम -->> श्रीसांतेरीदेवी, पावशी
24] कौंडिण्य नार्वेकर -->> श्रीशांतादुर्गा कणकादेवी पंचायतन, नार्वे, गोवा
पारकर -->> श्रीगणनाथ, खांडेपार, गोवा
मापारी -->> श्रीवेताळेश्वर, वेलींग, गोवा
पाटणेकर -->> श्रीमुळवीर, मालपे, पेडणे
करमळकर -->> श्रीकमलावती, करमळी, गोवा
सराफ -->> श्रीकंमळावती, करमळी, गोवा
मणेरकर उर्फ नारवेकर -->> श्रीकनकादेवी शांतादुर्गा, नार्वे, गोवा
हजारे -->> श्रीकनकादेवी शांतादुर्गा, नार्वे, गोवा
पारोडकर -->> श्रीकनकादेवी शांतादुर्गा, नार्वे, गोवा
25] पुतामाक्ष बांदोडकर -->> श्रीभूमिकादेवी, जुये, तिस्क, उसगाव, गोवा
सुकी -->> श्रीसांतेरीदेवी, पावशी
26] नानाभ्य मिशाळ -->> श्रीशिवमल्हारी, नारूळ
27] जमदग्नी तिळवे -->> श्रीसांतेरी, केरी, फोंडा, गोवा
पडते -->> श्रीसांतेरीदेवी, शिवोली, गोवा
वाळके -->> श्रीबांदेश्वर, बांदा
वारकेकर -->> श्रीशांतादुर्गा, नार्वे, डिचोली, गोवा
स्वार -->> श्रीरवळनाथ देव, पेडणे, गोवा
सावंत -->> श्रीबांदेश्वर, बांदा
मोरजकर -->> श्रीमोरजाई देवी, मोरजी, पेडणे, गोवा
आरसेकर -->> श्रीभगवेश्वर, तळावळी, गोवा
बांदेकर -->> श्रीबांदेश्वर, बांदा
28] कपी शिरसाट -->> श्रीमहालक्ष्मी, पालये, पेडणे, गोवा
29] वसिष्ठ मसूरकर -->> श्रीमाऊलीदेवी, मसूरी
कोचकर -->> श्रीमहामाया केळबाय, मये, डिचोली
तळावलीकर -->> श्रीमहालक्ष्मी, बंदिवडे
दिवकर -->> श्रीकाळभैरव, नार्वे
कोलवेकर -->> श्रीमहालक्ष्मी, बंदिवडे
प्रभू -->> श्रीवेताळेश्वर, वेलिंग
प्रभू -->> श्रीशांतादुर्गा वाघुर्मे
प्रभू -->> श्री लक्ष्मी रवळनाथ माशेल
प्रभू -->> श्रीभूमिकादेवी, हणजूण
पोरोब / प्रभू -->> श्रीकलमादेवी सत्पुरुष, पैरा
तळावलीकर -->> श्रीमहालक्ष्मी
30] कौशिक म्हापसेकर -->> श्रीशांतादुर्गा, धारगळ
पोकळे -->> श्रीकाळभैरव प्रभु पंचायतन, सावंतवाडी
खलप -->> श्रीशांतादुर्गा, धारगळ
म्हाड्दोळकर -->> श्रीलक्ष्मीनारायण, नावेली, साखळे
वेरेंकर -->> श्री अनंत, सावईवेरे
हणमशेट -->> श्रीवेताळ, कवळे
गांवस -->> श्रीशांतादुर्गा, धारगळ
31] कश्यप धुरी -->> श्रीशांतादुर्गा, वरगांव, माशेल
बाबशेट -->> श्रीकणकेश्वरी, नार्वे
कुशे -->> श्रीतुळजाभवानी, तुळजापूर
पर्रिकर -->> श्रीकेळबाय, कोल्हापूर
लाड -->> श्रीमहालक्ष्मी, नारूळ
कांदोळकर -->> श्रीशांतादुर्गा कांदोळकरीण, नानोडा
पंचवाडकर/मिराशी -->> श्रीवेताळ, पंचवाडी
रायकर -->> श्रीकामाक्षी, शिरोडा
32] सौनत्य भिसे -->> श्रीमल्हारी महालक्ष्मी, नारूळ
नेवगी -->> श्रीरेणुकादेवी, सौंदत्ती, धारवाड
बिडये -->> श्रीरामेश्वर, आचरा
33] विश्वामित्र कुडतरकर/ कुरतरकर -->> श्रीशांतादुर्गा चामुंडेश्वरी कुरतरी महामाया, घुडो-अवेडे
34] भारद्वाज वेटे -->> श्रीतुळजाभवानी, तुळजापूर
मराठे -->> श्रीतुळजाभवानी, तुळजापूर
पिंगे -->> श्रीशांतादुर्गा, गावठण, साखळी